पुण्यात निकालाआधीच भाजपची बॅनर्सबाजी ; चर्चेला उधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । 26 फेब्रुवारीला कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. 2 मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.

उद्या २ रोजी कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र त्याआधीच कसब्यात लागलेले विजयाचे मोठमोठे बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत. हेमंत रासने प्रचंड बहुमताने विजयी झाल्याच्या या बॅनर्सवरुन ठाकरेसेनेच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितलं की काय?’ असा सवाल करत संशय उपस्थित केला आहे.
दरम्यान निकालापूर्वीच कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासणे यांच्या विजयाचे मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत.यावरुन वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. निकाला आधाची भाजपने फ्लेक्सबाजी कशी सुरू केली? भाजपला कसब्याचा निकाल आधीच माहीत आहे का? असे सवाल विरोधकांकडून या निमित्ताने केले जात आहेत.

ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या फ्लेक्सवरून भाजपवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितलं की काय? सकाळी सकाळी रासने जिंकण्याची ही फ्लेक्स बाजी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आणणारी नाही का…?? या फ्लेक्स बाजीचा अर्थ काय काढायचा, हे तथाकथित महाशक्तीच्या मनसबदाऱ्यांनी कृपया आम्हाला समजावून सांगावे. कसब्यात लावलेल्या बॅनर्सवर हेमंत रासने यांचा विजयी मुद्रेतील फोटो लावण्यात आला आहे. त्यावर यतो धर्म: ततो जय: लिहिलेले आहे. त्यानंतर आमदार हेमंत (भाऊ) रासने यांचा कसबा पोटनिवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन, अशा शुभेच्छा देणारा मजकूर फ्लेक्सवर लिहिण्यात आला आहे. श्रीराम भक्त प्रथमेश सतिश पाठक यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. ते भाजपच्या पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. या बॅनर्सवर पाठक यांचाही फोटो आहे. ऐन मोक्याच्या ठिकाणी हा फ्लेक्स लावण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान अशाचप्रकारचे बॅनर्स काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांकडूनही लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा यावेळी समोर आला. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी कसब्यातील वेगवगेळ्या परिसरात असे बॅनर्स लावले. काही वेळातच हे बॅनर्स काढून टाकण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम