सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

ज्ञानोबा-तुकोबांच्या मराठीत मानवी जीवनाचे खरे सत्व - प्राचार्य सुनील पाटील

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी
     ज्ञानोबांनी मराठी भाषेचा पाया रचला. तुकोबांनी ती समृद्ध केली आणि त्या मराठीने अवघ्या महाराष्ट्रीयांचे जीवन समृद्ध केले. संतांनी मराठीतून दिलेला विचार आज अंगिकारण्याची खरी गरज आहे. कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’ असे क्रांतीगीत लिहून पारतंत्र्याविरोधात गर्जना केली. मराठी साहित्य आणि साहित्यिकांनी मराठी जनांवर अनंत उपकार केले आहेत. त्याची परतफेड करणे शक्य नसले तरी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. कारण या विचारांनी आपल्या अनेक पिढ्यांवर संस्कार केले. आजच्या तरुणाईपुढील अनेक प्रश्न या विचारांनी सुटू शकतात, असे प्रतिपादन शिवचरित्रकार व सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य सुनील पाटील यांनी केले. सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मराठी विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. त्यांनी यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विचारमंचावर उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील उपस्थित होते.
     ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ॲड. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी केले. प्रा.ज्योती नन्नवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.ए.एन. भंगाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी. एम. मराठे, प्रा. एम. डी. बिर्ला, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. व्ही. चिमणकर, डॉ. एस. जी. शेलार, प्रा. एस. एम. झाल्टे, डॉ. सी. एस. पाटील, प्रा. एस. ए. कोळी, डॉ. बी. एस. भालेराव, प्रा. आर.एम. गजभिये, डॉ. सचिन हडोळतीकर, प्रा. शिवाजी पाटील, डॉ. जनार्दन देवरे, डॉ. गजानन चौधरी, प्रा. स्नेहा गायकवाड, प्रा. प्रवीण देसले तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम