
टी-20 मध्येही विराटचा जलवा कायम !
दै. बातमीदार । १० नोव्हेबर २०२२ अॅडलेड ओव्हल विराट कोहलीचे आवडते मैदान आहे. विराट कोहलीने पुन्हा इतिहास रचला आहे. विराटने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना आज अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीला हा विक्रम करण्यासाठी फक्त 42 धावांची गरज होती. पण त्याने इंग्लंडविरुद्ध ताबडतोड अंदाजमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा कोहली पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 114 सामन्यांमध्ये 52.77 च्या सरासरीने 3958 धावा केल्या होत्या. यादरम्यान कोहलीने एक शतक आणि 36 अर्धशतके झळकावली. मात्र उपांत्य फेरीत 42 धावा करताच कोहलीने 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. कोहली याआधी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन हजार धावा करणारा पहिला क्रिकेटर बनला होता. गेल्या वर्षी त्याने ही कामगिरी केली होती. कोहलीने 87 सामन्यांच्या 81 डावांमध्ये 50.86 च्या सरासरीने 3 हजार धावा केल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम