“कुत्रा” निशाणीवरही मीच निवडून येतो : सत्तार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा हास्याचा विषय बनले आहे.

दोन दिवसांपूर्वी, वाशीम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर येथील अध्यक्षतेच्या कार्यक्रमांत बोलताना सत्तार म्हणाले की, “पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्हाला भेटण्यासाठी दोन मिनिटेही वेळ नव्हता, तर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रीच्या दोन वाजताही आवर्जून भेटतात, माझ्या सिल्लोड मतदारसंघात ३.२५ लाख हिंदू मतदार तर ५० हजार मुस्लिम मतदार बांधव असूनसुद्धा गेली २५ वर्षे मीच निवडून येत आहे. मला “कुत्रा” ही निशाणीवर जर निवडणुकीसाठी उभे केले तरी मीच निवडून येतो, कारण कुत्रा हासुद्धा त्याच्या मालकाशी इमान राखतो.”

दरम्यान, या वक्तव्यामुळे कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता. आता हे वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे कृषिमंत्री सत्तार यांची खिल्ली उडविली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम