चक्क पंतप्रधान मोदी देखील झाले ‘या’ गोलंदाजीच्या कामगिरीवर फिदा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ नोव्हेबर २०२३

देशात नुकतेच भारत आणि न्यझीलंड मध्ये झालेल्या सेमी फायनल सामन्यामध्ये भारतीय संघाने ७० धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 398 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाला 327 धावांवर रोखलं.

या विजयासह भारतीय संघाने चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंड संघाचा डॅरेल मिचेल याने जिगरबाज 134 धावांची शतकी खेळी केली. मात्र मोहम्मद शमीने सात विकेट घेत एकट्याने किंवींना गुडघे टेकायला भाग पाडलं. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करत खास करून मोहम्मद शमीचं कौतुक केलं आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?
टीम इंडियाचे अभिनंदन! भारताने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. आजचा सेमी फायनल हा स्पेशल ठरला. मोहम्मद शमीने वन डे वर्ल्ड कपमध्ये केलेली गोलंदाजी क्रिकेटप्रेमी आणि पुढील पिढ्यांच्या लक्षात राहिल म्हणत मोदींनी शमीचं कौतुक केलं आहे.

भारताने या सामन्यात विजय मिळवला असून आता 19 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनल सामन्यात विजय मिळवत इतिहास रचायचा आहे. 2019 मध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने पराभूत करत बाहेर ढकललं होतं. भारताने आता यंदा त्या पराभवाचा वचपा काढला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम