आता कुत्रा चावल्यास मिळणार २० हजाररुपयांपर्यत नुकसान भरपाई !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक राज्यात कुत्रा चावल्याच्या अनेक घटना तुम्ही आपल्या आजूबाजूच्या परिसरात नेहमी बघत असाल असे असतांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कुत्रा चावण्याच्या घटनेतील लोकांना हायकोर्टाने 20,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई निश्चित केली आहे. कुत्रा चावल्यास कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या खूणेसाठी पीडितांना 10,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाईल.

कुत्रा चावल्याप्रकरणी पीडितांना कुत्र्याच्या प्रत्येक दाताच्या खूणेसाठी किमान 10,000 रुपये दिले जातील. कुत्रा चावल्यामुळे त्वचेवर जखम झाल्यास किंवा मांसाचे नुकसान झाल्यास, 0.2 सेमी पर्यंतच्या जखमेसाठी किमान 20,000 रुपये भरपाई दिली जाईल, असे न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने सांगितले. चंदीगड, पंजाब आणि हरयाणातील कुत्रा चावण्यासंदर्भातील 193 याचिकांच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कुत्रा चावण्याच्या घटनांची नोंद करण्यासाठी समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारांनी प्राधान्याने जबाबदारी स्वीकारून याबाबत नियमावली बनवावी, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम