सर्वांनाच बसला आश्चर्य धक्का : बीचवर आला 50 फूट लांब मासा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑक्टोबर २०२३

जगभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असतांना असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हि घटना केरळमधून समोर आली आहे. केरळ राज्यातील कोझिकोडच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर एक भलामोठा मेलेला व्हेल मासा पाण्यातून वाहत आल्याचं पाहायला मिळालं आहे. व्हेल माशाचं शव समुद्रातून वाहून समुद्रकिनारी पोहोचल्याचं बोललं जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर इतका मोठा व्हेल दिसल्यानंतर तेथे लोकांनी मोठी गर्दी केली. एवढा मोठा व्हेल मासा समुद्रकिनारी कसा आला? हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

सर्वप्रथम काही स्थानिक मच्छिमारांना सकाळी 10:15 च्या सुमारास हा व्हेल मासा मृत अवस्थेत दिसला. एका मच्छिमाराने सांगितलं की, हा मेलेला मासा पाहिल्यानंतर तो दोन दिवसांहून जास्त दिवस मेल्याची शक्यता आहे. कारण मासा सडण्यास सुरुवात झाली होती. तसेच या व्हेलचं शरीर 15 मीटर म्हणजेच जवळपास 50 फूट लांब असल्याचंही सांगण्यात येत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, कोझिकोड कॉर्पोरेशनचे प्रभारी आरोग्य अधिकारी प्रमोद यांनी सांगितलं की, मृत्यूचं कारण शोधण्यासाठी व्हेलचे पोस्टमॉर्टम समुद्रकिनाऱ्यावरच केलं जाईल. शवविच्छेदनानंतर प्रोटोकॉलनुसार माशाला खड्ड्यात पुरण्यात येईल.

समुद्रकिनाऱ्यावर पडलेल्या व्हेलच्या मृतदेहाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. या महाकाय व्हेलला पाहून प्रत्येकजण चकित झाला आहे आणि हा मासा नेमका कुठून आला आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या व्हेल माशाच्या मृतदेहाचा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शनिवारी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिकांनी या माशाला पाहण्यासाठी गर्दी केल्याचं दिसत आहे. तर अनेकजण या माशासोबत सेल्फी काढत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम