कॉंग्रेसच्या माजी आमदाराला विधान भोवले : पक्षातून हक्कालपट्टी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मे २०२३ ।  राज्यातील कॉंग्रेस पक्षातील माजी आमदार आशिष देशमुख यांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वारंवार विधाने करणे भोवले आहे. त्यांना आधी नोटीस बजावण्यात आली होती. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यात आशिष देशमुख यांना निलंबित करण्यात आलं आहे. देशमुख यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.

तसं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल 5 मार्च रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर देशमुख यांनी 9 एप्रिल रोजी उत्तर दिलं होतं. देशमुख यांच्या या उत्तरावर शिस्त पालन समितीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

आपण आपल्या पक्षाविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे या प्रकरणात लागू होतात. आपण केलेल्या पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने तुम्हाला काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षाच्या कालावधीसाठी निष्कासन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळेच तुम्हाला सहा वर्षासाठी निष्काषित करण्यात येत असल्याचं निष्कासन आदेश पत्रात म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम