राज्यातील या जि.प.मध्ये होणार शेकडो पदासाठी भरती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मे २०२३ ।  गेल्या २०१९ मध्ये कोरोनाचे थैमान देशभर असतांना अनेक शासकीय कार्यालयात कुठ्ल्याशी शासकीय पदांवर नियुक्ती झालेली नव्हती तर आता जिल्हा परिषद भरतीला मान्यता मिळाली असून, नगर जिल्हा परिषदेमध्ये 950 विविध पदांची भरती होणार आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाने रिक्त पदांच्या रोष्टरला मान्यता दिली आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात भरतीची जाहिरात निघणार आहे.

नगरसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्तपदांची भरती रखडली होती. त्या भरतीला मागील आठवडय़ात जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्व पेसासह (आदिवासी भागानुसार) रिक्त जागांचे रोष्टर (बिंदुनामावली) विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडून तपासून आणली आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या 986च्या जवळपास जागा रिक्त दिसत होत्या.

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने 2019च्या नोटिफिकेशननुसार कनिष्ठ सहायकांच्या जागांमध्ये वाढ करण्याची सूचना केल्यामुळे रिक्त जागांच्या तपशिलात काही प्रमाणात वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही जिल्हा परिषदेत सर्व विभाग मिळून 950हून अधिक जागा रिक्त होणार असून, या जागांसाठी लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीसाठी राज्यपातळीवरून प्रक्रिया जाहीर करण्यात येणार असून, ग्रामविकास विभागाने भरतीप्रक्रिया राबवण्यासाठी राज्यपातळीवर खासगी कंपनीची नेमणूक केलेली आहे. संबंधित कंपनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱया जिल्हा निवड मंडळाच्या मार्फत प्रक्रिया पूर्ण करणार आहे. या भरतीप्रक्रियेवर विभागीय महसूल आयुक्तांचे नियंत्रण राहणार आहे. या महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांच्या वतीने देण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम