पोलीस दलात खळबळ : एसपीने बायकोसह पुतण्याला संपविले अन स्वतःवर झाळली गोळी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  राज्यातील पुण्यात व अमरावती पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरातीत चतुश्रुंगी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. गायकवाड यांनी त्यांची पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक याच्यावर गोळीबार करून हत्या केली आणि त्याच पिस्तुलातून स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

अमरावती पोलिस दलात कार्यरत असलेले एसीपी भरत गायकवाड हे पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होते. ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यात आले होते. त्यांनी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट सापडली नाहीये. तसेच आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुटुंबात काही वाद झाल्याची प्राथमिक माहिती देखील मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम