मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकरांचे निधन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  गेल्या अनेक महिन्यापासून मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. १०० पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केले. जयंत सावरकर यांचा जन्म गुहागरमध्ये 3 मे 1936 रोजी झाला होता. ते एक मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते होते. वयाच्या विसाव्या वर्षीपासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली होती. मराठी, हिंदी चित्रपट आणि मलिकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या जयंत सावरकर यांची 97 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.

मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातले असल्याने मध्यमवर्गीय विचारसरणीनुसारच जीवनक्रम असावे, असे त्यांच्या घरच्यांना वाटत होते. त्यांच्या नाटकात जाण्याला घरच्यांचा विरोध होता. त्यांनी देखील नियमितपणे नोकरी केली. पण त्याव्यतिरिक्त मिळणारा वेळ ते नाटकात घालवू लागले. १९५५ च्या सुमारास रंगभूमीविषयक काम करणारी सर्वच माणसे व्यासंगी, उच्चशिक्षित, संस्कारी घरातली होती. त्याचा त्यांना फायदा झाला असल्याचे ते सांगत. त्या सर्वांच्या सहवासातून मी शिकत गेलो असल्याचे ते कायम सांगत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम