मोठी बातमी : पाकिस्तानात मशिदीमध्ये स्फोट ; २९ पोलीस ठार !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जानेवारी २०२३ । पाकिस्तानातील पेशावर शहरातील पोलीस लाइन्समध्ये बांधलेल्या मशिदीत स्फोट झाला. याला आत्मघातकी हल्लाही म्हटले जात आहे. स्थानिक मीडिया खैबर न्यूजनुसार, आतापर्यंत 29 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 158 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील 90 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

“या” शेतीतून शेतकरी कमवितो कोट्यावधी रुपये !

हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. त्याच्या जवळच लष्कराच्या तुकडीचे कार्यालयही आहे. पोलिस लाइन्समध्ये उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, हा स्फोट खूप शक्तिशाली होता आणि त्याचा आवाज 2 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर धूळ आणि धुराचे लोट दिसत होते.

शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरहि या योजनेचा मिळेल लाभ !

आरोग्य विभागाने हे पत्र जारी करून लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

 

पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजनुसार, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले – नमाजच्या वेळी मशिदीमध्ये सुमारे 500 ते 550 लोक उपस्थित होते. फिदाईन हल्लेखोर मधल्या रांगेत हजर होता. येथे प्रवेश करण्यासाठी गेट पास दाखवावा लागत असल्याने तो पोलिस लाइन्समध्ये कसा पोहोचला हे समजू शकले नाही. मशीद कोसळली असून अनेक लोक तिच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे समजते.

शेतकरीने “या” फुलाची लागवड केल्यास लाखो रुपये कमविणार !

तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचा या भागात बराच प्रभाव असून यापूर्वी या संघटनेने येथे हल्ल्याची धमकीही दिली होती. या घटनेनंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. यामध्ये जखमींना रुग्णालयात नेताना दिसत आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आत्मघातकी हल्ला झाला होता. ज्यात एक पोलीस शहीद झाला होता. यासोबतच 10 जण जखमी झाले होते. आत्मघातकी हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, पोलिसांच्या सतर्कतेमुळे इस्लामाबादमध्ये मोठा हल्ला टळला होता.

शेतकरीना सरकार देणार या वाहनासाठी ५० टक्के अनुदान !

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम