बर्फवृष्टीत राहुल गांधी बरसले ; लाल चौकात फडकवला तिरंगा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जानेवारी २०२३ ।श्रीनगरमधील काँग्रेस कार्यालयावर राहुल गांधी यांनी सोमवारी तिरंगा फडकवून भारत जोडो यात्रेची सांगता केली. याची सुरुवात १४५ दिवसांपूर्वी कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी झाली होती. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 12.30 वाजता राहुल पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतील. आज सकाळपासून बर्फवृष्टी याठिकाणी होत होती यावेळी गांधी अशा परीस्थित सुद्धा जोरदार भाषण ठोकले आहे.

सकाळपासून येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. सकाळपासूनच कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. तर दुसरीकडे राहुल इथेही वेगळ्याच रंगात दिसले. बहीण प्रियंका यांच्यासोबत त्यांनी हिमवर्षावाचा आनंद लुटला. दोघेही एकमेकांवर बर्फ फेकताना दिसले.

रविवारी २९ जानेवारी रोजी राहुल गांधींनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गाडीत ते तेथे पोहोचले. त्यांच्यासोबत बहीण प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. तिरंगा फडकवल्यानंतर राहुल यांची भारत जोडो यात्रा संपली मात्र 30 जानेवारीला यात्रा संपणार होती. लाल चौकातील कार्यक्रमानंतर यात्रा संपली असून सोमवारी काँग्रेस कार्यालयात होणारा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम