जागृती मित्र मंडळ व मोहनराव नारायणा नेत्रालय यांच्या संयुक्त शिबिरात 250 व्यक्तींची नेत्र तपासणी

बातमी शेअर करा...

भडगाव(प्रतिनिधी) :-

     जागृती मित्र मंडळ भडगाव व नांदुरा येथील मोहनराव नारायणा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन डॉ. ईश्वरसिंग परदेशी यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने करण्यात आले.

     या शिबिरात एकूण 250 व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. या अंतर्गत शहरातील गरजू व गरीब रुग्णांची रुपये 1100 मध्ये मोतीबिंदू शश्रक्रिया नांदुरा येथील रुग्णालयात करण्यात येणार आहे.शिबिरात नेत्र तपासणी करून आय ड्रॉप मोफत देण्यात आले तर अ त्यल्प दरात चष्मे देण्यात आले.

     शिबिरात डॉ. विजय राजपूत, मारोती देशमाने, कृष्णा पाटील, संतोष वावगे यांनी रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला . शिबीर यशस्वीतेसाठी बाळासाहेब पारख ,युवराज चौधरी , योगेश शिंपी , गजु तांबटकर,अमोल कासार,सनी पाटील, दिनेश चौधरी,परमजीत गौर, मंदार कासार, प्रदीप मासरे , पार्थ कासार ,मयूर तांबटकर, कपिल पाटील , वरुण शिंपी ,मृणाल भांडारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

      सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश भंडारी यांनी तर आभार सुनील कासार यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम