शिंदेंना मुख्यमंत्री मानायला कुणीही तयार नाही : राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ फेब्रुवारी २०२३ । देशातील मुख्यमंत्र्यांची यादी आलेली आहे आणि यात आपल्या मुख्यमंत्र्यांचे नाव नाही, या प्रश्नाव बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले कि, ‘एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही’, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी सामनाच्या आग्रलेखासंदर्भाद 13 फेब्रुवारी माध्यमांशी बोलताना राज्यातील गोल्डन गँग शोधण्याचे आव्हान पत्रकारांना केले आहे.

देशातील मुख्यमंत्र्यांची यादी आलेली आहे आणि यात आपल्या मुख्यमंत्र्यांचे नाव नाही, असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना विचारल्यावर ते म्हणाले, “मुळात एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही. दहामध्येही नाव नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा कायम, महाराष्ट्र राज्य हे कायम औद्योगिक आणि आर्थिक दृष्या एक प्रगतशिल राज्य म्हणून देशात गेणले गेले. जगात आपल्या राज्याचे महत्व होते. गेल्या सहा किंवा सात महिन्यापासून महाराष्ट्र या देशाच्या खिस गणतीमध्ये अजीबात नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या पाच आणि चारमध्ये आले. हळूहळू महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती पकडत असताना महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. हे त्यासाठी कुठे तरी महाराष्ट्राचे पंख कापले जावेत. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास काही लोकांना पहावत नव्हता. त्यामुळे हे सरकार पाडून फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती या मुख्यमंत्री पदावर बसविल्यामुळे महाराष्ट्राची अदोगती सुरू आहे. उताराला लागलेली गाडी जी असते, अशी ही उताराला लागलेली गाडी आहे. या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री पद म्हणजे. महाराष्ट्र जो शिखरावर निघालाल होता. तो परत खाली कोसळताना दिसतोय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पहिल्या 10 मध्ये नाहीत. याचे वाईट वाटले पाहिजे. त्या मुंदे गटाला खास करून आणि भाजपच्या इथल्या प्रमुख लोकांना पण, त्यांना आनंदाच्या उकाळ्या फुटल्या असत्या. हे दुर्दैव आहे. एक फार सुंदर मंत्र होते, सेनापती बापट याचे “महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडीने चाले”. आज महाराष्ट्राशिवाय राष्ट्र चालविणे, ते सोपे आहे. हे दिल्लीचे तक्थ दाखवून देते.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम