नियमित तोंड येतय मग हे करा उपाय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  राज्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाळा सुरु झाला आहे पण अनेक भागात पाऊस नाही पण उष्णतेचे चटके मात्र कायम असतांना प्रत्येकाला उष्णतेत तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत.

हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही समस्या न सुटता आणखी वाढते. कारण पोटात अन्न नसल्याने अॅसिडीटी होते, ज्यामुळे उष्णता वाढते. अशावेळी तोंड येण्याचा त्रास आणखी वाढतो. यामुळे तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळावा यासाठी आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला मदत करु शकतात.

1) खोबरेल तेल…
खोबरेल तेलात दाहकविरोधी गुणधर्म असल्याने ते सूज आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करते. तोंडातील अल्सरचे चट्टे कमी करण्यासाठी तुम्ही कापसाचा तुकडा खोबरेल तेलात बुडवून ते प्रभावित भागावर लावा. यामुळे तुम्हाला अल्सरच्या समस्येपासून आराम मिळेल.

२) मीठाचे काही…
मिठाच्या पाण्याचे गुळण्या केल्याने तोंडातील अल्सरचे फोड अथवा चट्टे कमी होतात. मीठ हे संक्रमण बरे करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाका आणि चांगले मिसळून झाल्यावर त्याच्या गुळण्या करा.

३) काळे मनुके…
तोंडातील लाल वेदनादायी चट्टे कमी करण्यासाठी तुम्हा काळे मनुके सुमारे ३ तास पाण्यात भिजवून ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी ते खा, यामुळे पोटातील उष्णता कमी होत अल्सरपासून आराम मिळतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम