पोटाचे विकारापासून दूर राहण्यासाठी खास उपाय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जून २०२३ ।  प्रत्येक व्यक्ती दिवसभर काम करून नियमित आहार घेत असतो पण काही काही कारणाने पोटाच्या विकाराचे नेहमीच समस्या निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याची काळजी घेत असतांना पोटाचे विकार अगोदर जरी लहान असले तरी ते काही काळाने आरोग्यास घातक ठरू शकते. त्यासाठी पोटाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करावे ?

1) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.
२) १०० मि.लि पाण्यात एक चमचा मेथि दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे. व जेवणानंतर हे मेथिचे दाणे घालून खावे. याने सकाळी पोट साफ होते.

३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर घ्या. पाण्यासोबत.
४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे., रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात इसबगोल मिसळून घ्यावे.
५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.
6) दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे . आणि वरून दूध घ्यावे.
७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे. त्रिफळा चूर्ण मातिच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.
८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.
९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते.
१०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.
११) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते.
१२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम