न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कुल मधील मुलांनी “फादर्स डे निमित्त अनुभवला “आनंदी बाप”

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख ) “बाप”म्हणजे सतत काम,”बाप” म्हणजे सतत जवाबदारी आणि “बाप’ म्हणजेच सततची पीडा हीच बापाची ओळख असताना येथील न्यू व्हिजन स्कुल मधील विद्यार्थ्यांनी “फादर्स डे”च्या निमित्ताने एक हसतमुख आणि आनंदी बाप अनुभवल्याने सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक झाले.
विविध सणवार आणि वेगवेगळे “डे” करण्यात न्यू व्हिजन स्कुलने नेहमीच आपले वेगळेपण जपले आहे,त्यामुळे विद्यार्थी नेहमीच या उपक्रमांसाठी उत्सुक असतात,याच पद्धतीने यंदा 18 जून रोजी “फादर्स डे”केवळ नावाला साजरा न होता खऱ्या अर्थाने फादर्स तथा बापाचा सन्मान व्हावा या अनुषंगाने नियोजन करण्यात आले होते,यासाठी साऱ्याच पालकांना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते,विशेष म्हणजे सुरवातीला विद्यार्थ्यांच्या प्रेमळ हातांनीच आपल्या वडिलांना गुलाबपुष्प देऊन विशेष स्वागत करण्यात आले,हे चित्र प्रत्येक बापासाठी सुखकारक होते,यावेळी आयोजित कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन संस्थेचे चेअरमन निलेश लांडगे,तसेच अध्यक्ष शितल देशमुख व संचालक धनराज महाजन,आणि प्राचार्या सौ प्रेरणा पाटील तसेच पालक प्रतिनिधि यांनी केले.त्यानंतर इयत्ता दहाविच्या विद्यार्थ्यांनी वडिलांच्या जीवनावर आधारित गाण्यावर सुंदर असे नृत्य सादर केले.प्राचार्य प्रेरणा मैडम यांनी आपल्या भाषणातून पालक वर्गाना अनमोल असे शैक्षणिक मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित वडील पालकांसाठी संगीत खुर्ची ही स्पर्धा घेण्यात आली.सारा तणाव विसरून सर्वच पालकांनी या खेळाचा प्रचंड आनंद घेतला, मुलेही बापाला हसताना पाहून आनंदी झाली होती,यात पहिल्या गटात प्रथम क्रमांक लक्ष्मण शिंदे द्वितीय क्रमांक रवींद्र पाटील, आणि दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक ईश्वर पाटील यांनी पारितोषिके मिळविली,तसेच पालकांसाठीच विविध खेळ आणि स्पर्धाही यावेळी घेण्यात आल्या.यानंतर इयत्ता दहावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही यादिवशी गौरविण्यात आले.यावेळी सेल्फी पॉइंट ठेवण्यात आला होता,तेथे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसोबत फ़ोटो काढून ही आठवण साठवणीत करून घेतली.जाताना प्रत्येक पालकाने या उपक्रमाचे कौतुक करून शाळेचे विशेष आभार व्यक्त केले.या सर्व कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.

BJP add
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम