
अमळनेर च्या डॉ दिक्षिता गाढे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने राष्ट्रीय विकलांग पार्टी तर्फे करण्यात आला सत्कार
अमळनेर (प्रतिनिधी ) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रा विजय गाढे यांची कन्या डॉ दिक्षिता ही बीएचएमएस प्रथम श्रेणीत पास झाल्याने राष्ट्रीय विकलांग पार्टी तर्फे सत्कार करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या बीएचएमएस परिक्षेचा निकाल लागला असता अमळनेर चे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रा विजय गाढे यांची कन्या डॉ दिक्षिता ह्या संगमणेर येथील एम एच एफ होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय विकलांग पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिपक सुरेश पाटील,उपजिल्हा अध्यक्ष अमोल मधुकर पाटील,शहराध्यक्ष मोबिन कुरेशी,गुलाम मोहम्मद बेलदार, इक्बाल शेख आदी दिव्यांग कार्यकर्ते यांनी डॉ दिक्षिता यांचा घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.याप्रसंगी डॉ दिक्षिता यांनी सांगितले की, मी सदैव अपंग विकलांग बांधवांचा उपचार मोफत करून ऋणात राहू इच्छिते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम