महाविकास आघाडीत पुण्यात बिघाडी ; ठाकरे गट देणार उमेदवार ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जानेवारी २०२३ । राज्यात महाविकास आघाडी सत्तेतून पाय उतार झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीत थोड्या फार प्रमाणात वाद होते मात्र पुण्यातील या निवडणुकीमुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी झाली असावी असेच म्हणावे लागेल. कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक येत्या दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे अनेक इच्छुकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शहर भारतीय जनता पक्षाकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिंरजीव कुणाल यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे या पाच जणांची नावे प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात आली आहे.

तर, दुसरीकडे आता कसबा विधानसभा पोट निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कसबा पोटनिवडणूक लढवण्याची मागणी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोट निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची काल पुण्यात बैठक पार पडली.
या बैठकीत पुणे शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी इच्छा पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. शिवसैनिकांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, कालच्या बैठकीनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर वायरल केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात नेमकं काय होतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम