महिना अखेरीस सोन्याच्या दरात घसरण !
दै. बातमीदार । २८ फेब्रुवारी २०२३ । गेल्या दोन महिन्यापासून सोने व चांदीच्या भावात मोठी दरवाढ तर घसरण होत असतांना दिसून आली पण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी याच भावाची मोठी घसरण झालेली दिसून येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं खरेदी करणाऱ्या मुली, महिला आणि लग्नाच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर खाली घसरले आहेत. GST आणि RTGS वगळून 10 ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास 55,7000 रुपये झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर आज 55,712 रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,957 रुपयांवर बंद झाली होती. आज चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. चांदीचा दर 1,227 रुपये घसरून 63,104 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या किेंमतीमध्ये 225 रुपयांनी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. याचे दर 51 हजार 700 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत.
तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही संधी सोडू नका. कारण सोन्यामध्ये मोठी घसरण झाली आहे. मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञांच्या मते, सोन्याची किंमत यावर्षी, 64 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किंमती 59,000 रुपयांच्या आसपास पोहोचल्या होत्या. मात्र पुन्हा किंमती घसरल्या आहेत. आज 55,000 रुपयांच्या जवळ असल्याचे दिसते. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडियाच्या मते, यावर्षी सोन्याच्या किंमतीला मोठी गती मिळू शकते. कोल्हापुरातील सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) (जीएसटी वगळून) 10 ग्रॅम 24 कॅरेट – 55,900/- 10 ग्रॅम 22 कॅरेट – 51,430/- 10 ग्रॅम 18 कॅरेट – 43,600/- सोन्याचे दर ( प्रति 1 ग्रॅम) (जीएसटी सह) 1 ग्रॅम 24 कॅरेट – 5,590/- 1 ग्रॅम 22 कॅरेट – 5,143/- 1 ग्रॅम 18 कॅरेट – 4,360/- चांदिचे दर (जीएसटी वगळून) प्रति किलो – 63,800/- सांगली शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट – 56,100 10 ग्रॅम 22 कॅरेट- 52,840 10 ग्रॅम 20 कॅरेट- ………. 10 ग्रॅम 18 कॅरेट- 44,760 सांगली शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट – 5,610 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,181 1 ग्रॅम 20 कॅरेट- ……… 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,364 चांदिचे दर प्रतिकिलो – 64,000 अमरावती सोने,चांदी भाव आणी तापमान २७/०२/२०२३ अमरावती: सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट – ५५५५० ₹ 10 ग्रॅम 22 कॅरेट- ५१९८० ₹ 10 ग्रॅम 18 कॅरेट- ४२३८० ₹ अमरावतीतील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट – ५५५० ₹ 1 ग्रॅम 22 कॅरेट- ५१९८ ₹ 1 ग्रॅम 18 कॅरेट- ४२३८ ₹ चांदिचे दर प्रतिकिलो – ६४,५०० ₹ सोलापूर सोन्याचे दर सोन्याचे दर (प्रतितोळा) 10 ग्रॅम 24 कॅरेट -५६४०४ ₹ 10 ग्रॅम 22 कॅरेट- ५१७०३ ₹ 10 ग्रॅम 20 कॅरेट- ४७००३ ₹ 10 ग्रॅम 18 कॅरेट- ४२३०३ ₹ सोलापुरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट – ५६४० ₹ 1 ग्रॅम 22 कॅरेट- ५१७० ₹ 1 ग्रॅम 20 कॅरेट- ४७०० ₹ 1 ग्रॅम 18 कॅरेट- ४२३० ₹ चांदिचे दर प्रतिकिलो – ६३८८८₹
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम