पाळीव कुत्रा मरण पावल्याने परिवाराने उचलले ‘हे’ पाऊल; व्हीडीओ व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ नोव्हेबर २०२२ अनेकांना घरात कुत्र पाळण्याचे आवड असते व त्याचे त्यावर इतके प्रेम असते पण ते प्रेम इतके अति होते कि त्याचे कुत्रे मरण पावल्यावर ते हद्दपार करतील अस घडू शकते का ? यावर कुणाचाही विश्वास बसू शकत नाही पण व्हिडीओ व्हायरल झाला आहे एका कुटुंबाने पाळीव कुत्रा पाळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.पण मेलेल्या कुत्र्याच्या आठवणीत या कुटुंबाने असं काही केलं आहे जे लोकांना अजिबात आवडलं नाही.

 

 

हा कुत्रा घरातल्या लोकांना खूप प्रिय होता. खरं तर ही घटना ऑस्ट्रेलियातील एका कुटुंबाशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कुटुंबाकडे पांढऱ्या रंगाचा कुत्रा होता.हा कुत्रा या लोकांना खूप प्रिय होता, पण अचानक त्या कुत्र्याचा काही आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर हे कुटुंब अत्यंत दु:खी झालं. या कुत्र्याला दफन करण्याऐवजी त्याची एक आठवण ठेवण्याचा या कुटूंबाने निर्णय घेतला. त्यांनी कुत्र्याची संपूर्ण कातडी काढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कुटुंबाने या कातडीने कार्पेट बनवून आपल्या घरात ठेवले. असे करून आपला कुत्रा आपल्याबरोबर राहील असे त्याला वाटले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये फक्त कुत्र्याची कातडी दिसत असली तरी या कातडीचा गालिचाही बनवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. हा व्हिडिओ पाहून लोक संतापले आहेत. लोक म्हणतात की इतके प्रेम देखील योग्य नाही कारण ही प्राण्यांविरूद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी घटना आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम