फेमस गायक मीका सिंगची तब्येत खराब ; इतका झाला तोटा !
बातमीदार | २४ ऑगस्ट २०२३ | जगभरात नेहमीच चर्चेत असलेला बॉलिवूडचा फेमस गायक मीका सिंग हा आता जरा वेगळ्या चर्चेत आला आहे. बिग बाॅस ओटीटी 2 च्या फिनालेमध्ये मीका सिंग हा पोहचला होता. यावेळी मीका सिंग हा घरातील सदस्यांसोबत धमाल करताना दिसला. मीका सिंग याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मीका सिंग हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतो आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. विशेष म्हणजे मीका सिंग याचे चाहते हे फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही आहेत.
नुकताच आता मीका सिंग याच्याबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे येत आहे. स्वत: मीका सिंग याने याबद्दल माहिती शेअर केलीये. मीका सिंग याची तब्येत खराब झालीये. इतकेच नाही तर मीका सिंग याला बोलणे देखील कठीण झाले आहे. मीका सिंग याला मोठा फटका यामुळे बसला आहे. तब्बल 15 कोटींचे नुकसान मीका सिंग याचे झाले आहे. मीका सिंग हा जगभराच्या दाैऱ्यावर होता. काही दिवसांपासून सतत कॉन्सर्ट करत असल्याने त्याचा वाईट परिणाम हा त्याच्या आरोग्यावर झाला. धक्कादायक म्हणजे असा प्रकार मीका सिंग याच्यासोबत पहिल्यांदाच घडला आणि त्याची तब्येत इतकी जास्त खराब झाली की, त्याला कॉन्सर्ट न करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला.
अमेरिकेनंतर बाली, मलेशिया, सिंगापुर, थाईलॅंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये त्याच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यूएसनंतर मीका सिंग याचे सतत कॉन्सर्ट झाले. यामुळे आराम करायला अजिबातच वेळ मिळाला नाही आणि त्याचा परिणाम थेट आरोग्यावर झाला. आता डाॅक्टरांनी मीका सिंग याला आराम करण्याचा सल्ला दिलाय. इतके नाही तर मीका सिंग याला अजिबातच प्रवास देखील करायचा नाहीये. यामुळे आता सध्याच त्याला भारतामध्ये येणे देखील शक्य नाहीये. कॉन्सर्ट रद्द झाल्याने त्याचा मोठा फटका त्याच्या टिमला बसला आहे आणि तब्बल 15 कोटींचे नुकसान झाले आहे. शोचे तिकिटे विकली गेली होती. बऱ्यापैकी तिकिटांची रक्कम परत देण्यात आलीये. अचानक तब्येत खराब झाल्याने त्याला मोठा फटका हा मीका सिंह याला बसला आहे. आता मीका सिंग याच्या खराब झालेल्या आरोग्यामुळे चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. मीका सिंग याच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहते हे मोठ्या प्रमाणात प्रार्थना करताना देखील दिसत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम