अजित पवार पुन्हा येणार का ? सुळे म्हणाले…

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑगस्ट २०२३

राज्यातील शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंड केले आहे. यानंतर अनेक राजकीय घडामोडी राज्याने अनुभवल्या असून अजित पवार सत्तेत सामील होऊन आता महिन्याभराहून अधिक काळ उलटला आहे. त्याचवेळी दोन शदर पवार गट आणि अजित पवार गटात कोणतेही मतभेद असल्याचं दिसून आलं नाही. मात्र राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गटांमधील घडामोडींवर मित्रपक्ष सावध झाले आहे. या संपूर्ण घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठे भाष्य त्यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार गटाशी त्यांचा लढा वैचारिक आहे. मात्र एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. अजित पवार यांच्यामुळे पक्षात फूट नाही, असं तुम्हाला वाटतं का, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,घडलेल्या घटना माझ्यासाठी खूप दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. आता हा विचारधारेचा संघर्ष आहे. मी माझी निवडणूक भाजपच्या विरोधात लढले. मात्र जेव्हा आमच्या पक्षातील काही लोक असा निर्णय घेतात आणि पक्ष विस्कळीत होतो, ते दुर्दैवीच आहे. होय… हे एक भावनिक विभाजन आहे. शेवटी, राजकारण हे धोरणे आणि विचारसरणीचे असते. राजकारण काही नोकरी किंवा व्यावसाय नाही, की आवडलं नाही, तर तिकडं जावं, असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. अजित पवारांनी भाजपसोबत जाणं अनपेक्षित होत का, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला वाटत नाही की भाजपसोबत जाण्याचं काही विशेष कारण असेल. फुटलेल्या गटाकडून कोणतेही आरोप करण्यात येत नाही. भाजपशी हातमिळवणी करायची की नाही हा एकच प्रश्न होता. पक्षाच्या काही सदस्यांना ते योग्य वाटलं, तर आम्हाला ते योग्य वाटत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम