राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कोट्यावधी रुपये !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जुलै २०२३ ।  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १८६६.४० कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांसह दरवर्षी ६ हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत चालू वर्षाच्या एप्रिल ते जुलैदरम्यानच्या चौदाव्या हप्त्याचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सीकर (राजस्थान) येथे होणाऱ्या समारंभात वितरित केला जाईल. या सोहळ्याला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच केंद्रीय रसायन व खते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील ८८.९२ लाख लाभार्थीची बँक खाती आधार लिंक्ड लाभांच्या रकमेसाठी नोंदणी करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व लाभार्थीनी पंतप्रधान किसान योजनेचे लाभ मिळविण्यासाठी बँकेकडे आवश्यक अर्ज सादर करून आधार लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम