ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाविरुद्ध उच्च न्यायालयात सुनावणी सुरू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जुलै २०२३ ।  ज्ञानवापी संकुलाच्या सर्वेक्षणाविरुद्ध मशीद व्यवस्थापनाने दाखल केलेल्या याचिकेवर अलाहाबाद न्यायालयात मंगळवारी सुनावणी सुरु झाली. ज्ञानवापी मशीद मंदिरावर बांधली गेली आहे की नाही, हे शोधण्यासाठी जिल्हा न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाला (एएसआय) ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला मशिदीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अंजुमन इंतेजामिया कमिटीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मूख्य न्यायमूर्ती प्रितंकर दिवाकर यांनी बुधवारी पुढील सुनावणी ठेवली. मशीद व्यवस्थापनाच्या वतीने ज्येष्ठ वकील एसएफए नक्वी यांनी युक्तिवाद केला.

हिंदू पक्षाने जिल्हा न्यायालयात याचिका करून ज्ञानवापी मशीद मंदिरावर बांधली गेली आहे किंवा नाही, हे शोधण्यासाठी एएसआयकडून सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. ती मान्य करत न्यायालयाने शुक्रवारी एएसआयला ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार व आवश्यक असल्यास उत्खनन यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर एएसआयच्या ३० सदस्यीय पथकाने सोमवारी ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण सुरूही केले होते. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मशीद व्यवस्थापनाची बाजू ऐकून घेत सर्वेक्षणाला २६ जुलैपर्यंत स्थगिती देऊन त्यांना खालच्या न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध (सर्वेक्षण करण्याच्या) उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वेळ दिला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम