शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा व पर्जन्यमानाचा विचार करून शेती केली पाहिजे : पंजाबराव डख

बातमी शेअर करा...

भडगाव :प्रतिनिधी

भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्या वर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा व पर्जन्यमानाचा विचार करून शेती केली तर आपले नुकसान होणार नाही. पावसाचा अंदाज कसा घ्यायचा या विषयी हवामान आधारित शेती या विषयावर बोलतांना हवामान तज्ञ् पंजाबराव डख यांनी येथील केशवसूत ज्ञान प्रभोधिनी व्याख्यान मालेचे दुसऱ्या पुष्पत बोलतांना श्रोत्यांना अनेक गोष्टी सांगितल्या. व्यासपीढावार पाचोरा येथील युवानेते सुमित पाटील,डॉ. गोरख महाजन, दोंडाईचा येथील उधोजक राजपूत हे उपस्थित होते. पंजाबराव डख यानी पाऊस, वीज, ढगफुटी, चक्री वादळ हे केव्हा येतात, त्यांची कारणे, या बाबत सविस्तर विवेचन केले. मका, कापूस, सोयाबीन, तूर इत्यादी पिके घेतांना शेतकऱ्यांनी काय काळजि घ्यावी व पाऊस येण्याची सूचना आपणास निसर्गातील प्राणी, पक्षी, झाडें या द्वारे मिळत असतें आपण त्याचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे व त्या निकषावर आपले पिंकाचे नियोजन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. हे दुसरे पुष्प पाचोरा भडगाव चे विद्यमान आमदार किशोर पाटील यानी आपले पिताश्री कै. धनसिंग पाटील याच्या स्मृती पित्यर्थ आयोजित केले होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. दुर्गेश रुले यांनी तर आभार डॉ. अतुल देशमुख यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम