महामार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील दोन तरुण ठार

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३

जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असतांना पुन्हा एकदा भुसावळ तालुक्यात दुचाकीची सामोरासमोर धडक झाल्याने दोन तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वरणगाव व फुलगावातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील महामार्गावरील शिवाजी नगर येथे बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकल स्वारांनी एकमेकांना धडक दिली. यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले. या जखमींना वरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या भीषण अपघातात फुलगाव येथील माजी सैनिक कॉलनीतील विजय रामकृष्ण महाजन (वय ४७) आणि वरणगाव येथील गणपती नगरमधील आदर्श शाळेजवळ राहणारे ललित धांडे (वय ३५) या दोघांना आपले प्राण गमवावे लागले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होतांनाच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. फुलगाव ते वरणगाव या मार्गावर लहान-मोठे अपघात होत असल्याने येथे सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कधीपासून होत असली तरी याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही मृतांच्या पार्थिवाचे गुरुवारी सकाळी १० वाजता वरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. गिरीष उगले यांनी शवविच्छेदन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम