धक्कादायक : अल्पवयीन मुलीसोबत प्रेम अन मुलगी गर्भवती !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून अनेक अल्पवयीन मुलीना प्रेम प्रकरणात अडकवून त्यांच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेम संबध निर्माण करीत एका तरुणाने तिच्यासोबत शारिरीक संबध निर्माण करून तिला गर्भवती केल्याची घटना उघड झाली असून अल्पवयीन मुलीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अडावद पोलिसात एका विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१ ते ३१ मार्च २०२३ या महिन्याभरात तरुणाने चोपडा व जळगाव येथील त्याच्या मित्राच्या रूमवर तर अल्पवयीन मुलीच्या घरी येवून देखील वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.गणेश बुवा हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम