बापरे ! चक्क विमानात महिलेला चावला विंचू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ मे २०२३ ।  विमानात जिवंत पक्षी आणि उंदीर सापडल्याच्या घटना घडत असतानाच महिला प्रवाशाला विंचवाने दंश केल्याची घटना एअर इंडियाच्या नागपूर-मुंबई विमानात २३ एप्रिल रोजी घडली. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने माहिती दिल्यानंतर हे उजेडात आले. विमान विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी महिलेवर उपचार केले आहेत. तिच्या प्रकृतीचा धोका टळला आहे.

२३ एप्रिल रोजी एआय ६३० या विमानात महिला प्रवाशाला विंचवाने डंख मारला. ही घटना कळताच विमान मुंबईत उतरण्यापूर्वीच महिलेवर उपचारासाठी यंत्रणा सज्ज होती. विमान उतरताच तातडीने वैद्यकीय उपचार करून तिला रुग्णालयात दाखल केले. डिस्चार्ज होईपर्यंत प्रवाशाला सर्व प्रकारची मदत दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच एअर इंडियाच्या अभियांत्रिकी पथकाने प्रोटोकॉलचे पालन करून विमानाची कसून तपासणी केली. विंचू सापडला. त्यानंतर फ्यूमिगेशन प्रक्रिया करण्यात आली. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आणि गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. उड्डाण भरण्याआधी व्हॅक्यूम क्लीनरने संपूर्ण विमान स्वच्छ केले जाते. एखाद्या प्रवाशाच्या जुन्या बॅगेतून विंचू विमानात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेची विस्तृत माहिती देण्यास कंपनीच्या अधिकाऱ्याने नकार दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम