मुख्यमंत्री शिंदेंचा राज्यातील धडाका थंडावला ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ मे २०२३ ।  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री दोन ‎वाजेपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यातील लोकांना भेटणारा माणूस कायम‎ जाहीर कार्यक्रमात रमणारा नेता पण आता सत्तासंघर्षाची सुनावणीची‎ तारीख जवळ आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎ यांच्या कार्यक्रमाचा राबता कमी झाला‎ आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे ९‎ मंत्री आता मंत्रालयात दिसत नसून‎ शिवसेनेचे आक्रमक प्रवक्ते आता थंड‎ झाले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ‎ ‎ कार्यक्रमात शिंदेंसोबत असलेले‎ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्वचितच ‎ एखाद्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत ‎ दिसतात. त्याविषयी उलटसुलट चर्चा होत ‎ आहे.‎

मुख्यमंत्र्यांचा कारभार मुंबईतील वर्षा,‎ नंदनवन तसेच ठाण्यातील शुभदीप या‎ निवासस्थानातून चालतो. बैठका मलबार‎ हिलच्या सह्याद्री अतिथीगृहात आणि‎ मंत्रिमंडळ बैठकीवेळी मंत्रालयाच्या‎ सहाव्या मजल्यावरील सीएमओमध्ये‎ मुख्यमंत्री काम करायचे. दिवसभराच्या‎ सरकारी बैठका, सायंकाळचे जाहीर‎ कार्यक्रम आणि रात्री पक्षप्रवेशाचे सोहळे‎ असा पहाटे दोन वाजेपर्यंत त्यांचा व्यस्त‎ दिनक्रम होता. गेले ९ महिने असाच‎ दिनक्रम आहे. गणेशोत्सवात तर त्यांनी २४‎ तासांत ५०० पेक्षा अधिक गणेश मूर्तींचे‎ दर्शन घेतल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून‎ आवर्जून कळवण्यात आले होते.‎ मुख्यमंत्र्यांच्या कामकाज पत्रिकेतील‎ कार्यक्रम आता कमी दिसतात. त्यातही‎ आमदारांच्या मतदारासंघातील‎ बैठकासारखे अगदी क्षुल्लक असतात.‎ मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्ताव गौण‎ असतात. दर आठवड्याला मंत्रिमंडळ‎ बैठक होत नाही. यासंदर्भात‎ मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांकडे विचारणा‎ केली असता, खारघर उष्माघात‎ दुर्घटनेनंतर साहेबांनी जाहीर कार्यक्रम‎ कमी केले असल्याचे सांगण्यात आले.‎ शिवसेनेचे ९ कॅबिनेट मंत्री आहेत. सर्व‎ ‎आघाड्यांवर प्रवक्ते नेमलेले होते. उद्धव‎ गटाकडून नुसते चू झाले की शिंदे गटाची‎ फौज लागलीच तुटून पडत असे. गेल्या‎ दहा दिवसांत शिंदे गटात कमालीची‎ शांतता आहे. मुख्यमंत्री बॅकफूटवर आले‎ आहेत. मंत्री दिसेनासे झाले आहेत आणि‎ प्रवक्ते माध्यमांच्या संपर्कात नाहीत.‎ शिवसेनेचा आक्रमक गट एकदम कोशात‎ गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.‎

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम