राज्यात आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही ; ऑफर नंतर मुंडे म्हणाले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जुलै २०२३ ।  राज्यात काही दिवसापासून भाजपच्या महिला नेत्यान पंकजा मुंडे यांना अनेक पक्षाकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली होती. त्यावर नुकतेच पंकजा मुंडे यांनी मौन सोडले असून त्यावर ते मोकळेपणाने बोलले आहे. मला आलेल्या ऑफरवर मी अद्याप गांभीर्याने पाहिले नाही. पण पाहणार नाही, असे अजिबात होणार नाही, असे सूचक विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. भारत राष्ट्र समितीने नुकताच पंकजांपुढे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातच पंकजांनी हे विधान केल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.

पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्या म्हणाल्या की, सर्वच पक्ष माझ्याविषयी सकारात्मक बोलत आहेत. माझ्याविषयी कुणी सकारात्मक बोलत असेल, तर मी कुणाविषयी मी नकारात्मक बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मला आलेल्या ऑफरवर मी सध्या गांभीर्याने पाहिले नाही. पण बघणार नाही असे अजिबात नाही. कारण, कोणत्याही व्यक्तीला सिरीयसली न घेणे हा त्यांचा अपमान असतो, असे पंकजा म्हणाल्या.

पंकजा मुंडेंनी बीडमधील एका कार्यक्रमात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच 2024 हे वर्ष इतिहास घडवणारे असल्याचा दावाही केला. त्या म्हणाल्या – मला राजेंद्र मस्के म्हणाले, फेटा बांधा. मी म्हटलं, बांधणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्यानंतर मी गळ्यात फुलांची माळ घालणार नसल्याचा निश्चय केला होता. आता ओबीसी आरक्षण वाचल्यामुळे लोकांनी गळ्यात हार टाकले. दूध पोळल्यामुळे आमच्यावर ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. 2024 हे वर्ष इतिहास घडवणारे म्हणजेच इतिहास बदलणारे वर्ष आहे. मला तुमची निस्वार्थ साथ हवी आहे. मला पत्रकारांनी विचारले की, तुम्ही आमदार, खासदार किंवा ग्रामपंचायत सदस्यही नाही. त्यानंतरही सर्व पक्ष तुम्हाला ऑफर देतात. त्यावर मी म्हणाले की, ते मला माहिती नाही. पण मी सर्वसमावेशक चेहरा झाले आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम