युवासेनेच्या पदासाठी आदित्य व तेजसमध्ये भांडण : भाजप नेत्याचा आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ ।  महाविकास आघाडीची नागपूर येथे भव्य सभा झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांना व्यासपीठावर दिसल्याने राजकारण तापले होते. त्यानंतर आता भाजप नेते आ.नितेश राणे यांनी ठाकरेंवर निशाना साधत घरातील भांडण बाहेर काढले का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आदित्य ठाकरे यांचं वाढतं प्रस्थ कमी करण्यासाठी संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात भांडणं लावण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचा दावा देखील राणे यांनी केला आहे. नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात वाद लावण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू होतं आरोप भाजप नेते नितेश राणे यांने केला आहे. शिवसेनेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा प्रभाव वाढतोय म्हणून संजय राऊत आणि त्यांच्या टोळीने षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला असा घणाघाती आरोप त्यांनी संजय राऊतांवर केला आहे.

युवासेना प्रमुख म्हणून वरूण सरदेसाईंच नाव पुढे येत होतं, ते अचानक गायब झालं. यामागचं कारण म्हणजे, युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई झाल्यास आदित्य ठाकरेंची ताकद वाढणार मग आमचं काय होणार म्हणून लगेच तेजस ठाकरेंच्या नावाने सामनामध्ये जाहिरात झापून आणली जायची. तेजस ठाकरेंचे बॅनर लावायला महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांना सांगितलं जायचं असा दावा राणेंनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्या काळात या दोन्ही भावात मातोश्रीमध्ये भांडणं सुरू झाली. काही वेळासाठी तेजस ठाकरे कर्जतच्या फार्महाऊसवर राहायला गेले होते, असा दावा देखील नितेश राणे यांनी यावेळी केला आहे. संजय राऊतांना ज्या घरात मीठ खाल्लं तेथेही भांडणं लावण्याचं काम केलं असा आरोपही राणेनी यावेळी संजय राऊत यांच्यावर केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम