यावल : महाविकास आघाडीचा धुव्वा तर महायुतीला मोठे यश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ ।  यावल बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. तर भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या सहकार पॅनलने विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेना व रिपाइंला सोबत घेऊन सहकार पॅनलची निर्मिती केली.

मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे व युवा नेते अमोल हरीभाऊ जावळे यांनी पॅनलचे नेतृत्व केले. महाविकास आघाडीतर्फे आमदार शिरीष चौधरी यांनी धुरा सांभाळली. महायुतीला यावल येथे 15 जागांवर यश मिळाले असून महाविकास आघाडीला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

रविवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीच्या पॅनलने 18 पैकी तब्बल 15 जागांवर विजय संपादन करून एकहाती वर्चस्व मिळवले असून काही मतदारसंघात पुर्नमोजणी सुरू आहे. महायुतीचे बहुमत निर्विवादपणे प्रस्थापित झाल्याने यावल येथे भाजपा कार्यकर्त्यांनी अमोल जावळे यांना खांद्यावर घेत जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम