अखेर मिलिंद एकबोटे यांच्यासह तिघावर गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ सप्टेंबर २०२३ | पुणे महापालिकेसमोर मोर्चा काढून बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. एकबोटे यांच्यासह ३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी मिलिंद एकबोटे, भाजप आमदार नितेश राणे आणि भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे यांच्यासह इतर काही जणांनी पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. पुण्यातील एका मंदिराच्या अतिक्रमणाविषयी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये ‘आई भवानी शक्ती ते, पुणेश्वर मुक्ती दे’, ‘जय श्रीराम’ यासह इतर घोषणा देण्यात आल्या होत्या. दरम्यान, मोर्चामध्ये आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी वादग्रस्त विधान करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भाषणे दिली, असा आरोप अनेक जणांनी केला होता.
यावरुन मुस्लिम संघटना देखील आक्रमक झाल्या होत्या. नितेश राणे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा पुण्यात मोठं आंदोलन करू, असा इशाराही मुस्लिम संघटनांनी पुणे पोलिसांना दिला होता. यासंदर्भात एक निवेदन देखील पोलिसांना देण्यात आलं होतं. दरम्यान, मुस्लिम संघटनांनी दिलेल्या निवेदनानंतर पुणे पोलिसांनी आता पुणेश्वर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, किरण शिंदे , विशाल पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम