अखेर अमृतपाल सिंग पंजाब पोलिसांच्या ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ एप्रिल २०२३ ।  देशातील खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. अमृतपाल सिंग याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त समोर आले आहे.

अमृतपाल शनिवारी रात्री उशिरा पोलिसांना शरण आला. अमृतपाल सिंगचा साथीदार पापलप्रीत सिंग याला आधीच अटक करण्यात आली होती, तेव्हापासून अमृतपालला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अमृतपाल सिंहने शनिवारी स्वत: पंजाब पोलिसांना फोन करून आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार मोगा पोलिसांनी त्याला आज सकाळी ७ वाजता रोडे गावातील गुरुद्वाराजवळून ताब्यात घेतले आहे.

आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना केल्याचंही सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरलाही पंजाब पोलिसांनी अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेतलं होते. किरणदीप लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली होती. याशिवाय पंबाज पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या अनेक सहकाऱ्यांसह समर्थकांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अमृतपालचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम