बाजारपेठेत सोने खरेदीसाठी गर्दी जाणून घ्या आजचे दर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ ।  दिवाळीची लगबग सर्वकडे पहायला मिळत आहे तर दुसरीकडे सोने व चांदीचे दर कमी अधिक प्रमाणात होत असल्याने ग्राहक अजूनही खरेदी करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र बाजार पेठेत दिसू लागले आहे. दरम्यान, अशातच तुम्ही जर सोने चांदी खरेदीची योजना आखात असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर किती आहेत?

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली तर आजही सोने चांदीतही घसरण दिसून आली. आज (11 ऑक्टोबर) 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,600 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,930 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 595 रुपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव
चेन्नई – 52,420 रुपये

दिल्ली – 52,100 रुपये

हैदराबाद – 51,930 रुपये

कोलकत्ता – 51,930रुपये

लखनऊ – 52,100 रुपये

मुंबई – 51,930 रुपये

नागपूर – 51,960 रुपये

पुणे – 51,960 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे. आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क : सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम