आयटी विभागाला येणार चांगले दिवस ; जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ ऑक्टोबर २०२२ । शेअर बाजारात नियमित खाली वर होत असल्याने काही क्षेत्रात मोठा फटका बसू लागला आहे पण या वर्षी आयटी सेक्टर अंडरपरफॉर्म करत आहे. वाढत्या महागाईमुळे यूएस फेडनं केलेल्या व्याजवाढीमुळे अमेरिका आणि यूरोप मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते असं बोललं जात आहे. असं असताना आयटी सेक्टरशी निगडीत कंपन्यांनी त्रैमासिक निकाल जाहीर केला आहे. कंपन्यांचा निकाल पाहता वैभव अग्रवाल (Vaibhav Agrawal) (रिसर्च हेड, बसंत माहेश्वरी वेल्थ अॅडव्हायजर्स एलएलपी ऑन आयटी सेक्टर) यांनी सांगितलं की, आयटी कंपन्यांचे निकाल जाहीर होत आहेत, अमेरिका आणि युरोप या दोन्ही देशांमध्ये खूप मागणी आहे.

वैभव अग्रवाल यांनी सांगितलं की, आयटी कंपन्यांच्या ग्राहकांद्वारे तंत्रज्ञानावरील खर्च चालूच राहणे अपेक्षित आहे आणि मंदीच्या परिस्थितीत कपात करणे ही शेवटची गोष्ट असेल. तसेच, पुरवठ्याची स्थिती सुधारली आहे. पुढे जाऊन मार्जिन स्थिर झाले पाहिजे आणि मागणीची चिंता कमी झाली पाहिजे. वैभव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मोठ्या कंपन्या बायबॅकची घोषणा करतात, तेव्हा यामुळे या क्षेत्राचा दृष्टीकोन दिसतो. आयटी शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसते. बर्‍याच मिडकॅप आयटी कंपन्या मोठ्या वाढीची क्षमता असलेल्या विशिष्ट विभागांवर लक्ष ठेवून आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत आयटी क्षेत्रात पुन्हा वाढ दिसू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम