विशाखापट्टणममध्ये अग्नितांडव : ४० बोटी जळून खाक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० नोव्हेबर २०२३

देशभर हिवाळा सुरु असल्याने थंडीचे वातावरण सुरु आहे पण यात देखील अनेक ठिकाणी आग लागल्याच्या अनेक घटना घडत असतांना विशाखापट्टणम शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्यात. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. स्थानिक मच्छिमारांनी या बोटीला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मच्छीमारी करून अनेक बोटी किनाऱ्यावर परतल्या होत्या. यावेळी अचानक एका बोटीत स्फोट झाल्याचा आवाज आला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मच्छीमारांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. या स्फोटात बोटीला आग लागली. पुढे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. आगीत तब्बल 40 बोटी जळून खाक झाल्यात. या दुर्घटनेत आग नेकमी कशाने लागली याचे ठोस कारण अद्याप समजलेले नाही. स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काही मच्छीमारांनी या बोटीला आग लावली असावी असाही संशय अन्य मच्छीमारांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी घटनास्थळी पाहाणी केली असून अधिक तपास सुरू आहे. मच्छीमारांसाठी आपल्या बोटी म्हणजे उदनिर्वाहाचे मोठे साधन. मात्र आता बोट जळून खाक झाल्याने पुढे काय करावं आणि जगावं कसं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम