‘मुळशी पॅटर्न’चा थरार : कोयत्याने वार करत तरुणाची हत्या !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० नोव्हेबर २०२३
राज्यात पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोहिम आखली असतांना पुणे शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादामधून एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मयत सिद्धार्थ आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपींनी सिद्धार्थची हत्या करण्याचा प्लान आखला. रविवारी रात्री आरोपींनी शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थला गाठलं आणि मारहाण सुरू केली. सिद्धार्थने आरोपींच्या तावडीतून सुटका करत पळ काढला.

तेव्हा आरोपी त्याच्या पाठीमागे कोयते घेऊन लागले. जीव वाचवण्यासाठी सिद्धार्थ ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला. मात्र, आरोपींनी त्याला पाठलाग करत गाठलं. जीव वाचवण्यासाठी सिद्धार्थ आरोपींकडे माफीची याचना करत होता. आरोपींनी कुठलीही दयामाया न दाखवता त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत सिद्धार्थच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ओसवाल बिल्डिंगवर हत्या झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम