फटाक्याच्या दुकानाला आग ; १२ जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑक्टोबर २०२३

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू स्थित अनेक तालुक्यात एका फटाक्याच्या दुकानात आग लागली असून, यात १४ जण मरण पावले. या आगीच्या घटनेत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर इतर दोघांची प्राणज्योत उपचार सुरू असताना मालवली. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी घटनास्थळाचा दौरा केला. यावेळी मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत त्यांनी जाहीर केली.
बेंगळुरूतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटक सामग्री वाहनातून खाली उतरवली जात असतानाच शनिवारी दुपारी अचानक आग लागली.

या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आगीत गंभीररीत्या भाजले गेले आहेत. या आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे ९ बंब घटनास्थळी दाखल झाले व अथक परिश्रमाअंती आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. नवरात्री व दिवाळी सणानिमित्त या दुकानात लाखो रुपयांचे फटाके आणले होते. आग लागल्यामुळे त्यांचा स्फोट झाला. यात परिसरात उभी असलेली काही वाहने जळून खाक झाली, असे पोलिसांनी सांगितले. आग लागण्याचा हा प्रकार तामिळनाडूच्या सीमावर्ती भागात घडला. मृतांमध्ये तामिळनाडूच्या अम्मलेपट्टई, तिरुपत्तूर जिल्ह्यातील कामगारांचा समावेश आहे. या आगीत दुकानमालकासह काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, फटाक्यांच्या दुकानातील आगीच्या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम