मोठी बातमी : देशातील पाच राज्यातील निवडणुका जाहीर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑक्टोबर २०२३

देशात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जरी तयारी सुरु केली असली तरी त्याआधी मात्र देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आलीये. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मतदान होईल. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगाणात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. ३ डिसेंबरला निकाल लागेल. फक्त छत्तीसगडमध्ये मतदान दोन टप्प्यात होईल, इतर चार राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम