“पाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली, माफी मागतो”- शरद पवार

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २२ एप्रिल २०२४ | अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, यशोमती ठाकूर आदी दिग्गज नेते सदर प्रसंगी उपस्थित होते. आपल्या भाषणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत टीका केली. भाषणात त्यांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर नाव न घेता टीका केली. याविषयी बोलताना शरद पवारांनी आपली चूक झाली, असे थेट विधान केले आहे.

“मी इथे आलोय तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना अमरावतीकरांनी खासदार केले. पाच वर्षांचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावे आणि अमरावतीकरांना सांगावे की आमच्याकडून चूक झाली. ही चूक आता पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे”, असे पवार म्हणाले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम