आदिवासी बांधवांच्या घराला आग लागून लाखोंचे नुकसान; ६० हजार रुपये रोख जळून खाक

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १३ एप्रिल २०२४ | पारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावरील पारोळ्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतर असलेले धाबे येथील एका आदिवासी भिल्ल समाजाच्या बांधवाच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे रात्रीचे नुकसान झाल्याची घटना दि. ११रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली असून याबाबत धाबे गावातील अनिल हिरामण पवार यांचे घर दूध डेअरीला लागून असलेल्या मंदिराजवळ असल्याने ते रात्री जेवण करून दिवा लावून झोपलेले होते. तसेच, मंदिराची वायर झोपड्यावर पडल्याने अचानक आग लागल्यावर तात्काळ अनिल पवार व त्यांचे कुटुंब झोपेतून उठून बाहेर पळाल्याने जीवित हानी टळली.

परंतु, घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले ६० हजार रुपये रोख जळून खाक झाले तर घरातील संसार उपयोगी वस्तू, कपडे, धान्य, भांडी, आदी जळून खाक झाले. रात्री पारोळा नगर पालिकेच्या अग्निशमन बंब चालक मनोज पाटील, जितेंद्र पाटील शेळावे यांच्यासह धाबे गावातील तरुणांनी आग विझविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु, आगीने रौद्र रूप घेतल्यामुळे सर्व घर जळून संपले. त्यांचा संसार उघडा झाला त्या गरीब कुटुंबाला शासनाकडून तात्काळ पंचनामा करून मदत मिळावी अशी मागणी अनिल पवार व गावातील नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम