मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते ‘वर्षा’वर ध्वजारोहण !
दै. बातमीदार । २६ जानेवारी २०२३ । देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिन आज देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ वर ध्वजारोहण केले. याप्रसंगी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माध्यमांशी बोलताना सीएम शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
लोकशाहीत सर्वांना पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांचा ठाणे जिल्ह्यातील आजच्या दौऱ्यावर सीएम शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. आज उद्धव ठाकरे यांचा ठाण्यामध्ये दौरा आहे. त्या ठिकाणी मोठी रॅली व सभा होणार आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाही, अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावे लागले? या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याची चिंता नसावी.
प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना व महाविकास आघाडीबाबत केल्या वक्तव्यावर सीएम शिंदेंना प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे आमचे स्नेही आहेत. तर शरद पवार हे मोठे नेते आहेत. प्रकाश आंबेडकरांनी काय वक्तव्य केले, त्यावर मी काहीही मत मांडू शकत नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम