प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी ‘या’ टिप्स करा फोलो !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ राज्यात प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालल आहे. प्रदूषणाने भयंकर रूप धारण केल आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसून येता आहेत. प्रदूषणाचा मोठा फटका बसतो तो आपल्या डोळ्यांवर. प्रदूषणामुळे डोळ्यांना खूप गंभीर दुखापतही होऊ शकते.प्रदूषणाचा त्रास नेहमीच असतो.

पण ऑक्टोबर महिन्यापासून पुढे हवेची गुणवत्ता खालावू लागते. जणू काही आभाळाने प्रदूषणाची चादर पांघरली आहे. प्रदूषणामुळे श्वास घेतांना त्रास होण, डोळ्यात जळजळ होण अशा आरोग्याशी संबंधित अनेक तक्रारी सुरू होतात. हवेच्या प्रदूषणामुळे आजकाल प्रत्येकाच्या डोळ्यांना जळजळ जाणवते आहे.

1. डोळे थंड पाण्याने धुवा : डोळ्यांना काही त्रास होत असेल तर डोळे थंड पाण्याने धुवावेत. प्रदूषणामुळे तुम्हाला जळजळ होत असेल तर तुम्ही तुमचे डोळे वारंवार थंड पाण्याने धुवावेत. कारण या कार्बन ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईडच्या उच्च एकाग्रतेमुळे असा त्रास होऊन चिडचिड होते.

2. चष्मा किंवा गॉगल वापरा : जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना वायू प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर तुम्ही बाहेर जाताना गॉगल वापरा यामुळे डोळ्यांचे संरक्षण होईल. प्रदूषणाचा थेट परिणाम डोळ्यांवर होणार नाही.

3. स्क्रीन डिवायसेस पासून दूर राहा : डोळ्यांना जास्त त्रास होत असेल, तर डोळ्यांना विश्रांती द्या. अगदी ऑफिस मध्ये असाल तरी पाच दहा मिनिट ब्रेक घ्या. आवश्यक असेल तेव्हाच फोन किंवा कॉम्प्युटर वापरा. यासोबतच भरपूर पाणी प्या.

4. हेल्दी फूड खा : वायू प्रदूषणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही हेल्दी फूडही खाणे महत्वाचे आहेत. यामुळे आपल्या शरीराची इम्मुनिटी वाढते. आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा, ज्यात भरपूर जीवनसत्त्वे आहेत आणि तुमच्या डोळ्यांनाही फायदा होईल. काकडी, गाजर, हिरव्या पालेभाज्या खा.

5. डोळ्यांचा मेकअप करू नका : जर तुम्ही बाहेर जात असाल तर यावेळी डोळ्यांचा मेकअप टाळा, कारण मेकअप आणि प्रदूषण दोघंही डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात. डोळ्यांना खाज सुटू शकते आणि डोळ्यांना हानी पोहोचते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम