या कारणाने फ्रीजरमध्ये ठेवू नये पाण्याची भरलेली बाटली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ एप्रिल २०२३ ।  सध्या उन्हाळ्याचा महिना सुरु आहे. प्रत्येक व्यक्ती घरातील फ्रीजरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. पाण्याने भरलेली काचेची बाटली फ्रीजरमध्ये ठेवली असता, फ्रीजरच्या आतल्या तापमानामुळे पाणी गोठते म्हणजेच बर्फ बनते. जेव्हा पाणी गोठते तेव्हा त्याची घनता कमी होते कारण बर्फ पाण्यापेक्षा कमी डेन्सिटीचा असतो. यामुळे द्रव्यमान स्थिर होते कारण पाणी बाहेर काढले जात नाही किंवा त्यातून कोणत्याही प्रकारची गळती होत नाही.

साध्या-सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, बर्फाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, त्यामुळे त्याचे प्रमाण वाढते आणि बर्फ जास्त जागा व्यापतो. यामुळे बर्फ जास्त जागा घेत असल्याने बाटली फुटू शकते. तथापि, काचेच्या बाटलीमध्ये क्रॅक येऊ शकतो की नाही हे पाण्याच्या प्रमाणावरही अवलंबून असते.

प्लास्टिकच्या बाटलीतही ठेवू नका पाणी

कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फ्रीजमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमध्ये अधिक बॅक्टेरिया असतात. फ्रीजमध्ये पाणी ठेवताना चुकूनही स्वस्त प्लास्टिकची बाटली वापरू नका. अशा बाटलीमध्ये बॅक्टेरिया फार लवकर वाढू लागतात. तसेच फ्रीजमध्ये बाटली ठेवायची असेल तर उत्तम दर्जाची बाटली वापरा. या व्यतिरिक्त, पाण्याची प्लास्टिकची बाटली नेहमी 2 ते 3 दिवसांत स्वच्छ धुवावी. जेणेकरून तुम्ही कोणत्याही बॅक्टेरियाच्या संसर्गापासून सुरक्षित राहाल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम