आजचे राशिभविष्य दि २२ एप्रिल २०२३

बातमी शेअर करा...

मेष – रखडलेली कामे पूर्ण होतील होईल. महत्त्वपूर्ण निर्णय हे गुप्त ठेवा. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून मन समाधानी राहिल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन उत्पनात वाढ होईल. व्यापारात आर्थिक दृष्ट्या प्रलंबित असणारी कामे पूर्णत्वास जातील. प्रशासकीय क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेतील व्यक्तींना विशेष लाभ होईल. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल.पत्नीकडून सहकार्य आणि कुटुंबातील इतरांकडून प्रोत्साहन मिळेल. उर्जात्मक आणि उत्साही दिवस आहे.

वृषभ  – व्यक्तिगत समस्याचा प्रभाव कामावर राहिल. काही अप्रिय घटनेमुळे त्रास सहन करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानी बळा. नोकरीत दुसऱ्यावर रोष करू नका. वाईट संगती पासुन सावध रहा. घरातील मौल्यवान वस्तु गहाळ किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून देण्याची संभावनाआहे. आपले निर्णय चुकीचे ठरू शकतात. व्यसनी मित्रामुळे नुकसान होईल.व्यसनापासुन दुर रहा. मोठी आर्थिक गुंतवणुक करू नका. आर्थिक हानी संभवते.

मिथुन – अपेक्षीत लाभ मिळेल. नोकरीत आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. राजकीय कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आर्थिक आवक वाढेल. आज आपल्या कामात उत्साह वाटणार आहे. बुद्धीचा वापर करुन पैशाची गुंतवणूक करा. प्रवास सुखकर व हितकारक ठरतील. सामाजिक मान सन्मान मिळेल. मुलाच्या बाबतीत आनंदाची बातमी मिळेल. आपलं कर्तुत्व अर्थात स्वतला सिद्ध कराल.

कर्क – नवीन योजनेचा शुभारंभ होण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. अनेक नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. नोकरदार पत्नीकडून सहकार्य लाभेल. त्यांच्या बढतीचे योग आहेत. व्यापारात लाभ होऊन नफ्यात वाढ होईल. दूरवरचे प्रवास आनंददायक होतील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. मुलांच्या भवितव्याचा चिंता दूर होईल. धार्मिक भावना वाढीस लागेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल.

सिंह – वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल. कुटुंबातून आपल्या कामास सहकार्य लाभणार नाही. निरर्थक कामात वेळ वाया घालवू नका. वेळेचा अपव्यय टाळा. शेअर मार्केट व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. स्थावर मालमत्तेत काही अडचण येण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींची भेट होईल. कोर्टकचेरी कायदयाचे वाद असतील तर सामोपचाराने मिटवा. आर्थिक योग मध्यम आहे. आपल्या आक्रमक स्वभावामुळे जवळचे मित्र दूर जाण्याची शक्यता आहे. दुरचे प्रवास घडतील.

कन्या – वरिष्ठांकडून नाराजी आढवून घ्याल. मानसिक स्वास्थ बिघडेल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. शारिरीक व्याधी जुने आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत वैचारिक पातळीवर मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारिक प्रकरणात जबाबदारी वाढणार आहे. आपआपसातील वाद समझदारीने मिटवा. भागीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास करू नका. शारिरिक शस्त्रक्रिया अपघात याचे भय संभवते. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक तंगी निर्माण झाल्यामुळे मानसिक ताण वाढणार आहे.

तुला – समाजात व कुंटुंबात मानसन्मान मिळेल. नवीन योजना फायदेशीर ठरतील. व्यापारात काही नवीन भागीदारा सोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदारा कडून सहकार्य लाभेल. प्रवासातून लाभ घडतील. जुणी येणी वसुल होतील. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगति होईल. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत. सार्वजनिक कार्यात आपला लौकिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कलाकारांना योग्य संधी मिळतील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक – तरूण तरुणीचे विवाह योग जुळतील. प्रेमप्रकरणात कुटुंबाच्या विरोधात जावून कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रिय व्यक्तीबरोबर अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आपल्या संशयीवृत्तीवर आवर घाला. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायातील चिंते मुळे मन उदास राहील. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कलाकारांना काही नवीन संधी मिळतील.महिला वर्गाचा आदर राखा. पती-पत्नीत वाद होणार नाही याची काळजी घ्या. हुद्दा अधिकार व सरकारी नोकरी यापासुन लाभ होईल.

धनू – आपल्या व्यसनांना आवर घाला. शारिरिक व्याधीचा कामावर विपरित परिणाम होईल. अपूर्ण राहिलेली कामे वेळेत पूर्ण करण्यास कसरत करावी लागेल. व्यापारात प्रतिस्पर्थ्यासोबत आव्हान निर्माण होईल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. सयंमी भूमिका घ्या. आळस झटकून कामाला लागा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. मित्रमैत्रिणीं सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावे. कायदेशीर बाबीत अडकले जाण्याची शक्यता आहे. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल.

मकर – आज मनोधैर्य वाढेल. रोजगारात प्रतिमा आणि प्रतिश्रा उचांवेल. कार्यात विशेष यश येईल. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. साहसी वृत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. उताविळपणा करु नका. नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनोरंजनाकडे कल वाढेल. छोट्या छोट्या बाबींकडे लक्ष दया. समाजात कुटुंबात आपल्या कार्याचे कौतुक होईल. आपला आहार वेळेवर घ्या. विद्याभ्यासासाठी उत्तम दिनमान आहे.

कुंभ – वडिलोपार्जित इस्टेट वास्तू याविषयी कामे पार पडतील. नवीन घर खरेदीचा योग आहे. आपल्या वस्तुची देखभाल कराल. नोकरीत इच्छेप्रमाणे बदली किंवा बढ़ती मिळण्याचे योग आहेत. मित्र सहकारी यांची मदत मिळेल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. सामजिक प्रसिद्धि मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत. गीतकार व गायक वादक यांना संधी मिळेल. राजकारणी लोकांची लोकप्रियता वाढीस लागेल.

मीन – आपले कर्तुत्व सिद्ध कराल. पराक्रम व साहसी वृत्तीत वाढ होईल. व्यापारात नवीन संधी सोडू नका. नोकरीत एका नव्या समुहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल.स्वतःचे निर्णय स्वतः घेणे फायदेशीर राहील. व्यापारात नवीन प्रस्ताव आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत. विवाहइच्छुकांचे विवाह योग आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम