
दै. बातमीदार । १४ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाच्या विरोधात वातावरण तापताना दिसत होते. सतत चित्रपटाला विरोध केला जा होता.
इतकेच नाही तर पठाण चित्रपटाच्या विरोधात देशामध्ये अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. पठाण या चित्रपटामध्ये बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते. मात्र, शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता सुरूवातीपासूनच होती. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान खान हा चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार होता.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाण्यावरून मोठा वाद सुरू असताना शाहरुख खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने या वादावर भाष्य केले नव्हते. या वादापासून दूर राहणे शाहरुख खान यानेही पसंद केले. विशेष बाब म्हणजे शाहरुख खान किंवा पठाण चित्रपटाची टीम चित्रपटाचे प्रमोशन करताना अजिबात दिसली नाही. कोणत्याही शोमध्ये जाऊन यांनी चित्रपटाचे प्रमोशन केले नाही. फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. Ask SRK सेशनमधून तो सतत चाहत्यांच्या संपर्कात होता.
sir agar iss baar reply nhi mila na toh aapko fan part 2 banane ki zarurat padh jayegi #AskSRK 🥲🔪👀
— 🖤SKM_SRKIAN🖤 (@Skmoin35877175) February 14, 2023
पठाण चित्रपटाला रिलीज होऊन आता तब्बल तीन आठवडे झाले आहेत. मात्र, तरीही Ask SRK सेशनमधून शाहरुख खान हा चाहत्यांच्या अजूनही संपर्कात आहे. या सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो.
या सेशनमध्ये शाहरुख खान याचे चाहते अनेकदा त्याला भन्नाट प्रश्न विचारताना देखील दिसतात. विशेष म्हणजे शाहरुख खान हा देखील अत्यंत हटके स्टाईलमध्ये उत्तर देतो.
नुकताच शाहरुख खान याने Ask SRK सेशन घेतले. यावेळी एका चाहत्याने लिहिले की, सर, यावेळी तुमचा रिप्लाय आला नाही तर फॅन पार्ट 2 बनवावा लागेल….यासोबतच चाहत्याने काही रडण्याचे, चाकूचे इमोजी पाठवले. यावर शाहरुख खान याने रिप्लाय देत लिहिले की, मी तसेही फॅन 2 बनवणार नाही… कर तुला जे करायचे ते… हाहाहा…आता शाहरुख खान याच्या या रिप्लायची चर्चा रंगताना दिसत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम