हवामान विभागाचा अंदाज : जळगाव ठरले सर्वात कमी तापमानाचे शहर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक शहरात हिवाळ्याच्या थंडी वाढत आहे तर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे कोकण, गोव्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. या भागात थंडी कायम आहे. दरम्यान, गुरुवारी जळगावमध्ये राज्यातील सर्वांत कमी तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.

गेले काही दिवस उत्तरेकडून थंड वारे राज्याच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांचे तापमान घटले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे असल्यामुळे या भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील तापमानात सध्या चढउतार होताना दिसत आहे. काही भागात काही वेळ ढगाळ वातावरण राहत आहे. सकाळी वातावरणात थंडी जाणवत आहे. तर काही भागात दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे.

हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी शनिवारी आणि रविवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला तसेच यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. येत्या ३ ते ७ नोव्हेंबरदरम्यान कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम